शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, शनिवारी श्रीरामपुरात बंद

0
20

अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी गेल्या अनेक दशकांपासून श्रीरामपूरकरांची मागणी असताना शिंदे-फडवणीस सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो श्रीरामपूरकरांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे शनिवार दि.17 जून रोजी श्रीरामपूर बंदची हाक सर्वपक्षांच्यावतीने व श्रीरामपूरकरांच्यावतीने देण्यात आली आहे.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला देऊन शिंदे-फडवणीस सरकारने श्रीरामपूरकरांच्या तोंडाला पाने पुसली असून सरकारच्या या निर्णयाचा तमाम श्रीरामपूरकरांनी बंदमध्ये सहभागी होऊन निषेध करणार आहे. दि. 17 जून रोजी सर्व श्रीरामपूरकरांनी कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन श्रीरामपूर मर्चंट असोशिएशन तसेच सर्वपक्षियाच्या वतीने करण्यात आले आहे.