कर्जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणारा व त्याला मदत करणारा अशा दोघांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पळवुन नेणारा अजीम खलील शेख (वय 21 रा. थोटेवाडी, दुरगाव, ता. कर्जत) व मदत करणारा मनोज बापु कटारे (वय 23, मुळ रा. लोणीमसदपुर, ता. कर्जत, हल्ली रा. पवई झोपडपट्टी, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.
23 मे 2023 रोजी कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक गणेश वारूळे, हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, रोहित मिसाळ, सागर ससाणे, रोहित यमुल, रणजीत जाधव, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, राहुल गुंडू व भाग्यश्री भिटे यांची तीन वेगवेगळी पथके नियुक्त करण्यात आली होती.
या पथकाने पीडितेसह पळवून नेणार्यांचा पनवेल रायगड , कोल्हापुर
व पुणे तसेच अजमेर, राजस्थान येथे शोध घेतला. अजमेर येथील बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते त्यामध्ये दिसून आले. पोलिसांनी परिसरातील 700 ते 750 हॉटेल व लॉजेस चेक केले व परिसरातील खादीम, एंजन्ट यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली. तसेच अजमेर परिसरातील स्थानिक व्हॉट्सप ग्रुप व सोशल मिडीयाच्या मदतीने फोटो प्रसिध्द करून त्या आधारे तपास सुरू केला. परंतु ते अजमेर येथुन जयपुर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जयपुर येथे जावुन तपास करता ते जयपुर येथुन सवाईमाधवपुरा येथे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसुन आले.