आमदार राम शिंदे यांचा अधिवेशनात तरांकित प्रश्न स्वप्नील खाडे यांच्या मागणीला यश
जामखेड शहरामध्ये बीड रोड जुन्या डि.जे. हॉटेलच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरावरून मेन लाईन गेलेली आहे. याच भागात दि. २६/०५/२०२३ रोजी कु. ओमी मस्कर वय ९ वर्षे रा. वरकुटे ता.करमाळा जि.सोलापूर येथील रहिवासी असलेली मुलगी. ही आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्नानिमित्त आली असता, स्लॅप खेळत असताना तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईनचा धक्का बसला त्यात तिचा मृत्यु झाला त्याने जामखेड शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त झाली, जामखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे स्वप्नील खाडे यांनी दी.1 जून 2023 रोजी थेट आंदोलनाचा इशारा दिला तसेच निवेदन मागणी केली, जामखेड तहसीलदार साहेबांनी तत्काळ लेखी उत्तरात आश्वासन दिले व सबंधित कार्यालयास सादर केले, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी हे निवेदन जामखेड येथील विद्युत महामंडळाचे उप-अभियंता, व जामखेड तहसीलदार, व पोलीस निरीक्षक यांच्यासह आमदार श्री राम शिंदे यांना दिले होते तसेच कामाची मागणी केली होती,
या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला.
शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर लेखी उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे की, सदर घटना खरी असून जामखेड शहरातील मुख्य वीज वाहिनी इतरत्र हलविण्याबाबत जामखेड उप विभागात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.मयत मुलीच्या कुटुंबियांना महावितरणातर्फे तातडीची मदत म्हणून २० हजार रूपये देण्याकरीता महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.११ के. व्ही. वीज वाहिनीमुळे अपघात टाळण्याकरीता तातडीची उपाययोजना म्हणून सद्य:स्थितीत जामखेड शहरातील अरुंद रस्त्यालगत असलेल्या ११ के. व्ही. वीज वाहिनीकरीता कोटेड कंडक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सदर काम २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येईल. असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे.