नगर तालुक्यातील विश्वजीत कासार व त्याच्या टोळी विरुध्द पुन्हा मोक्का अंतर्गत कारवाई…
दि. ३०/ ४/२०२३ रोजी ४ : १५ वा. सुमारास यातील फिर्यादी यांची चुलती शोभा लोखंडे ह्या त्यांच्या घरासमोर असताना यातील आरोपी क्रमांक १ व २ आले आणि दादागिरी करुन २,७०,०००/- रुपये खंडणीची मागणी करुन ते दिले नाही या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ, दमबाजी, धक्काबुक्की करत असतांना फिर्यादीचे वडील नाथा ठकाराम लोखंडे हे नमुद आरोपींना म्हणाले की, कशाचे पैसे दयायचे ? काय कारण ? असे म्हणाले असता त्याचा राग धरून यातील आरोपी क्रमांक १ व २ यांनी नाना ठकाराम लोखंडे, वय ४९ वर्ष, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर यांना शिवीगाळ करून त्यांचे पोटात व छातीत लाथा मारून बेशुद्ध करून जिवे मारले व यातील आरोपी नं.३ व ४ यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना फोनवरून शिवीगाळ करून दुकान चालू ठेवण्यासाठी खंडणी मागून तो यातील आरोपी क्रमांक १ याच्याकडे देण्याबाबत धमकावले बाबत अनुराज नाथा लोखंडे, रा.वाळकी, ता. जि. अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन नंबर ३७६/२०२३ भा.द.वि.फलम ३०२, ३८४ ३८६ २८७, ३२३, ५०४, ५०६, ५०७, ३४, १२० (ब) दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात (१) इंद्रजीत उर्फ फौज्या रमेश कासार, वय २६ वर्षे, रा.वाळकी, ता. जि. अहमदनगर (२) गुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग, वय २९ वर्ष रा. सदर व (३) अशोक उर्फ सोनू विठ्ठल गुंड, वय २४ वर्षे, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आलेली असून ते सध्या जेलमध्ये आहेत तर आरोपी नामे (१) विश्वजीत रमेश कासार (टोळीप्रमुख) रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर हा अद्याप फरार आहे. यातील टोळीप्रमुख विश्वजीत रमेश कास्टर (टोळीप्रमुख) रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर वेगवेगळ्या साथीदारांसह एकूण १९ गंभीर स्वरुपाचे मालाविरुध्दचे व शरीराविरुध्दचे गुन्हे केलेले आहेत. त्यातील कोतवाली पोलीस स्टेशन मुर ३९६/२०१५ भाविक ३९४,३९० सह आर्म ऍक्ट कलम ४/२५ अन्वये दाखल गुन्ह्यात मा.जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर या मा. न्यायालयात सुनावणी होवून मा. न्यायालयाने विश्वजीत रमेश कासार व त्याच्या अन्य दोन साथीदारांना १० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे तसेच विश्वजीत रमेश कासार व त्याच्या अन्य साथीदारांविरुध्द यापूर्वी देखील मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून त्याने मा. उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद या न्यायालयाकडुन वैद्यकीय उपचारासाठी जमीन घेवून मुदतीनंतर परत कारागृहात हजर न होता तो फरार झालेला आहे. सदर फरार कालावधीत त्याने वरील प्रमाणे खुनासह खंडणीचा गुन्हा केलेला असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी मा. पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना मोक्का कायद्यातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणेकामी अहवाल सादर केला होता. यावर मा. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी (१) विश्वजीत रमेश कासार (टोळी प्रमुख) रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर व टोळी सदस्य (२) इंद्रजीत उर्फ फौज्या रमेश कासार, २६ वर्ष, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर (३) शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग, वय २९ वर्षे, रा. सदर व (४) अशोक उर्फ सोनू विठ्ठल गुंड, वय २४ वर्षे, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर यांच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये वाढीव कलम लावण्याची मंजुरी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी दिलेली असून सदरची कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.