दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष पदी सुरेश जाधव, सेक्रेटरी पदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर व गणेश परभणे, सह सेक्रेटरी पदी अरविंद साठे व कार्याध्यक्ष पदी शिवराम भगत यांची बिनविरोध निवड
नगर -दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन ची सन 2023-25 या कार्यकाळा करिता विश्वास गड रिसॉर्ट, पुणे या ठिकाणी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत असो. चे अध्यक्ष पदी सुरेश जाधव, सेक्रेटरी पदी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष पदी गजेंद्र राशीनकर व गणेश परभणे, सह सेक्रेटरी पदी अरविंद साठे व कार्याध्यक्ष पदी शिवराम भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती मावळते अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिली.
असो. चे वतीने सदर निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍडव्होकेट सचिन इथापे यांची नेमणूक करण्यात आली. या वेळी अध्यक्ष पदासाठी असो. चे सदस्य सुरेश जाधव, सुरेश खरपूडे, गजेंद्र राशीनकर, गणेश परभणे व शिवराम भगत यांनी अर्ज दाखल केले असता असो. चे माजी अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी सदर निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन केले असता सुरेश जाधव वगळता इतर सदस्यांनी बिनशर्त अर्ज मागे घेऊन पाठिंबा दिला असता सुरेश जाधव हे असो. चे अध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले.
यावेळी संपूर्ण कार्यकारणी व पदाधिकारी यांची निवड करण्याचे अधीकार अध्यक्ष सुरेश जाधव यांना देण्यात आले असता त्यांनी मावळते अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांची सेक्रेटरी पदी निवड केली तर सहसचिव पदी पुन्हा अरविंद साठे यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी तरुण सदस्य गणेश परभणे व मनसे चे शहर अध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांची निवड करण्यात येऊन कार्याध्यक्ष पदी शिवराम भगत यांची एकमताने निवड केली. तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून सुरेश खरपूडे, शिरीष चंगेडे, राजेंद्र छल्लानी, संजय सुराणा, सुनील गांधी, विकास पटवेकर, गणेश क्षीरसागर, संजय जंजाळे, अमोल तोडकर, रमेश बनकर व मयूर भापकर अशी नेमणूक करण्यात आली तर निमंत्रित सदस्य म्हणून संतोष बोरा, रामचंद्र मुलतानी, निखिल परभणे, संतोष तोडकर व अनिल टकले यांची निवड करण्यात आली.
असो चे अध्यक्ष पदी सुरेश जाधव यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करतांना सर्व सभासदांचे आभार मानले व या पुढे असो. चे कार्य सर्वानी मिळून करावयाचे असून असो ची प्रगती कशी होईल याकडे विशेष लक्ष देऊन सभासदांचे हित जोपासले जाईल असे आश्वासन दिले तर नवनिर्वाचित सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, असो. चे तळागळातील सदस्यांचा विचार करून कार्य करण्यात येईल व सर्व सभासदांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
सदरहू सभेची सुरवात असो. चे मावळते सचिव संतोष बोरा यांनी उपस्थिताचे स्वागत करून करण्यात आली तर आभार असो चे सहसचिव अरविंद साठे यांनी मानले. या वेळी असो. चे एकूण 52 सभासदा पैकी 44 सभासद उपस्थित होते.