अहमदनगर देशातील पहिले 1547 अग्निवीर टँकमॅन जवान राष्ट्रसेवेसाठी सज्ज,पासिंग आऊट परेड समारंभ

0
24

अग्नीपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या देशभरातील 1 हजार 547 अग्नीविरांनी अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटरमध्ये प्रशीक्षण पूर्ण केले आहे. हे जवान देशातील विविध रेजिमेंटमध्ये सहभागी होऊन राष्ट्रसेवेसाठी सज्ज झाले आहेत.

नगर येथील आर्मर्ड कोर सेंटर एवं स्कूलमध्ये अग्नीवीर पासिंग आऊट परेड समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. परेडमध्ये अग्नीविरांनी सैन्य संगीतावर कदम ताल करत शिस्तप्रिय प्रदर्शन केले. विशिष्ट सेवा मेडल कमांडेट आर्मड कोर सेंटर एवं स्कूलचे मेजर जनरल अनिल राज सिंह कहलों, यांनी या परेडची समीक्षा केली. नव्याने दाखल झालेल्या अग्नीविरांनी 31 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विरांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सैन्य प्रशिक्षणांतर्गत ड्रायव्हिंग अँड मेंटनेंस ट्रेनिंग तसेच अद्ययावत प्रशिक्षण दोन टप्प्यात देण्यात आले. आता हे अग्नीवीर जवान कुशल टँकमॅन म्हणून पासपाऊट झाले आहेत. आता पुढील कालावधीत पास झालेले सर्व जवान विविध रेजिमेंटमध्ये देशसेवा करणार आहेत. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या अग्नीविरांना मेजर जनरल अनिल राज सिंह कहलों यांच्या हस्ते मेडल देऊन गौरवीण्यात आले. त्याचबरोबर अग्नीवीरांच्या परिवारीतील सदस्यांना गौरव पदक प्रदान करण्यात आले.प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या अग्नी वीर जवानांना मेडल देऊन गौरविण्यात आले.मेजर जनरल अनिल राज सिंह कहलों. यांनी अग्निविरांच्या कुटुंबातील सदस्यांचाही पदक देऊन गौरव केला.