काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल, लोकसभेत पुन्हा आवाज घुमणार…

0
21

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची ऑर्डरही काढण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष करून आनंद साजरा केला.