बोल्डनेस आणि बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेली शर्लिन चोप्राने राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शर्लिन लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या वक्तव्यांमुळेही ती अनेकदा ट्रोल होत असते. शर्लिनने राहुल गांधींसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. ‘तुला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का?’ उत्तरात ती म्हणाली, ‘हो, का नाही.’ यासोबत शर्लिनने एक अटही ठेवली. लग्नानंतर आपण आडनाव बदलणार नाही, असं तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या शर्लिन चांगलीच चर्चेत आली आहे. राहुल गांधींनी शर्लिन चोप्राच्या या अटी मान्य केल्या तर ती त्यांच्याशी लग्न करण्यास तयार आहेत. शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.