फ्लेक्सवर आ.रोहित पवारांबरोबर एकत्रित फोटो…खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया..

0
25

राजकारणामध्ये कटुता न ठेवता विकासासाठी एकत्र यावं लागतं असं मत खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलं. ते नगरमध्ये बोलत होते. कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये रोहित पवार यांच्या फ्लेक्सवर सुजय विखे यांचे फोटो लागले त्यावर ते बोलत होते. कुणी कुणाचा फोटो लावायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. कार्यकर्ते कुणाचा फोटो लावतात हे काय कुणाला विचारून लावत नाहीत. एक काळ असा होता माझे फोटो कोणी लावत नव्हतं, आज सगळेच लावतात. हा वैयक्तिक प्रश्न असतो, मात्र विकासाच राजकारण करताना एकत्र यावं लागतं तेव्हाच विकास होतो, असं विखे यांनी म्हटलं आहे.