भंगारातील वस्तूंपासून बनवली चक्क ६ चाकी बाइक जबरदस्त जुगाड…व्हिडीओ

0
20

एका वृद्ध इंजिनियर काकांनी भंगारातील जुन्या पार्ट्स पाहून दोन, चार नाही तर चक्क सहा चाकी बाइक बनवली आहे. जी रस्त्यावर धावताना पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.सोशल मीडियावर भंगारातून बनवलेली सहा चाकी बाइक चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती रस्त्यावरून ही अनोखी सायकल चालवताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील असून जिथे राहणाऱ्या एका वयस्कर इंजिनियर काकांनी ही बाईक बनवली आहे. गॅरेजमध्ये पडलेल्या जुन्या आणि वापरात नसलेल्या पार्ट्सच्या मदतीने त्यांनी ही ६ चाकी बाईक बनवली आहे. या बाईकला अगदी घोड्यासारखा आकार देण्यात आला आहे.या बाईकच्या मागे एक छोटी मशीन बसवण्यात आली आहे, जी इंजिनचे काम करते. ही बाईक त्याच इंजिनच्या मदतीने धावताना दिसत आहे. ही बाइक खूप संथ गतीने चालत असली, तरी रस्त्याने येणा-जाणारे लोक तिच्या उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत. काकांनी जुगाडपासून बनवलेल्या या बाइकवर एक हँडलही फिक्स केले आहे, जे अगदी बाईकच्या हँडलप्रमाणे दिसत आहे.