महागडी आलिशान कार नव्हे, ही तर आपली ‘रिक्षा’… भन्नाट जुगाड व्हिडिओ

0
31

एका रिक्षावाल्यानं आपल्या रिक्षाला अशा पद्धतीनं मॉडिफाय केलंय की त्यापुढे कोट्यवधी रुपयांच्या BMW, मर्सिडीज, रॉल्स रॉयस कार सुद्धा फिक्या पडतील.

इतकी लग्झरी रिक्षा तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल. या रिक्षामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या केवळ महागड्या गाड्यांमध्ये अनुभवता येतात. जसं कंफर्टेबल सीट, म्युझिक सिस्टम, LED स्क्रीन, सनरूफ, पंखा, विविध रंगाच्या लाईट्स शिवाय नाश्ता वगैरे करण्यासाठी एक लहानसं डायनिंग टेबल सुद्धा आहे. या रिक्षातून प्रवास करताना जणू तुम्ही आलिशान गाडीतून प्रवास करताय असंच वाटेल.