देशातील पहिले मोफत आयव्हीएफ उपचार केंद्र, अपत्य प्राप्ती साठी इच्छुक दाम्पत्यांना लाभ…

0
51

गोवा देशातील असं पहीलं राज्य आहे जिथं आयव्हीएफ ट्रीटमेंट मोफत होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी आणि आययूआय फॅसिटीली सुरू केली. गोवा मेडिकल कॉलेजच्या सुपर स्पेशॉलिटी ब्लॉकमध्ये १०० पॅरेंट्स या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, हेल्थ केअरमध्ये राज्य सरकारने मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, देशातला हा असा एक मोफत रुग्णालय आहे जिथं आयव्हीएफ उपचार होतील. रुग्णांकडून पैसे घेतले जाणार नाही. सीएसआरच्या माध्यमातून पैसे येतील. राणे म्हणाले, निपुत्रीक दाम्पत्य उपचारासाठी बाहेरच्या राज्यात जातात. आयव्हीएफ उपचारासाठी लोकं पुणे किंवा कोल्हापूरला जातात.