नगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीनजीक होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी एस.टी.महामंडळाच्या शेकडो बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज 17 ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एस.टी.बससेवा ठप्प झाली. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे दौऱ्यावर निघालेले असताना त्यांना रस्त्यात शाळा, कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेले विद्यार्थी दिसले. तनपुरे यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचण समजून घेतली तसेच काही विद्यार्थ्यांना स्वत:च्या गाडीत लिफ्टही दिली.
'शासन आपल्या दारी' या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून… pic.twitter.com/IaLd1VpVsi
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) August 17, 2023