भिडे गुरुजी यांनी मध्यंतरी साईबाबांच्या पूजेवरून टिका करीत साईबाबा देव नाहीत असे वक्तव्य केले होते. त्यावरुन भिडे गुरुंजीवर साईभक्त नाराज झाले होते. यापार्श्वभूमीवर नगर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत साईबाबा समाधी मंदिरात जावून दर्शन घेतलं. त्यावरून आ.रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. फडणवीस यांनी साईबाबांचरणी नतमस्तक होवून आपल्या कथित गुरुजींना ज्ञानामृत पाजलं हे बरं झालं असे व्टिट पवार यांनी केलं आहे.\
श्री साईबाबा हे आमचं श्रद्धास्थान आहे, हे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन देवेंद्र फडणवीस साहेब आपण आपल्याच कथित 'गुरुजीं'ना ज्ञानामृत पाजलं, हे बरं झालं.
याबद्दल आपले खरंच आभार!
या कृतीतून आपण मोठं मन केलं आहेच पण आता इतर थोर व्यक्ती आणि संतांविषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्यांविरोधातही… pic.twitter.com/Qvvr8149JZ— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2023