विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी पाकिस्तानी तरूणी थेट श्रीलंकेत…व्हिडिओ

0
39

आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तानमधील तिसरा सामना अनिर्णित राहिला. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या षटकांत भारताच्या चार विकेट्स गमावल्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पांड्याने भारताचा डाव सावरला. भारताने पाकिस्तानपुढे २६७ धावांचं आव्हान ठेवलं. पण पावसाने व्यत्यय आणल्याने भारत-पाकिस्तानमधील हाय होल्टेज सामना अनिर्णित राहिला.

सामन्यानंतर एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संबंधित तरुणी भारतीय फलंदाज विराट कोहलीवर स्तुतीसुमनं उधळताना दिसत आहे. संबंधित तरुणी खास विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी पाकिस्तानहून श्रीलंकेत आली होती. संबंधित तरुणी म्हणाली, “विराट कोहली हा माझा आवडता खेळाडू आहे. मी खास त्याच्यासाठी इथे मॅच बघायला आले होते. तो शतक करेल, असं मला अपेक्षित होतं. पण माझा अपेक्षाभंग झाला. मी पाकिस्तान आणि विराट कोहली दोघांनाही पाठिंबा देत आहे.”