1BHK फ्लॅट 2.5 कोटी रुपयांना..
व्हिडीओच्या सुरवातीला हा मुलगा प्रेक्षकांना नमस्कार करतो. त्याच्या मागे मागे हा कॅमेरा जातो, हा मुलगा या 1BHK मधला हटके असणारा मास्टर बेड, किचन, बाथरूम दाखवतो. हे सगळं तो उपरोधिकपणे दाखवतो. मग प्रेक्षकांना घेऊन वरच्या मजल्यावर जातो, टेरेस दाखवतो. हे सगळं दाखवताना तो फ्लॅटचं इतकं कौतुक करतो की बास. हा मजेशीर व्हिडीओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघाल. साऊथ मुंबई मध्ये घरांची किंमत प्रचंड आहे. पण इतकी किंमत भरून सुद्धा बदल्यात काय मिळतं हे हा मुलगा या व्हिडीओमध्ये सांगतोय. व्हिडीओमध्ये दाखवला जाणारा हा 1BHK फ्लॅट 2.5 कोटी रुपयांना असल्याचं तो सांगतोय.