मा.आ.नरेंद्र घुले यांची व्हिएसआय गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी बिनविरोध निवड

0
847

भारतातील साखर उद्योगात अग्रस्थानी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय) पुणे या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी 1975 साली या संस्थेची स्थापना केलेली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून सहकारी,खाजगी साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी यांना तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित मार्गदर्शन केले जाते.अशा या संस्थेवर
लोकनेते मारुतराव घुले पाटील
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाली आहे.
श्री.नरेंद्र घुले पाटील हे सन 1992 पासून आजतागायत शासनाचे व सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱयांचे सर्वांगिण प्रगतीचे दृष्टीने लोकोपयोगी कार्य केलेले आहे व करत आहेत. श्री मारुतराव घुले पाटील व जनता शिक्षण संस्थेच्या मार्फत परिसरातील शेतकऱ्यांचे मुला-मुलींच्या शिक्षणाची सुविधा निर्माण केली.लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे आधुनिकीकरण,सहवीज निर्मिती प्रकल्प विस्तारवाढ,आसवानीआधुनिकीकरण,इथेनॉल निर्मिती प्रकल्प,ऊस विकासाच्या विवीध योजना राबवून साखर उतारा वाढविण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न करत आहेत.तसेच नगर जिहल्यातील सात तालुक्यांसाठी कृषी विद्यान केंद्राची स्थापना करून केंद्राचे माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकऱयापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न श्री.घुले करीत आहेत.त्यांच्या या निवडीचे जिल्ह्यातील मान्यवरांनी यांनी स्वागत केले आहे.