Home नगर शहर Ahmednagar news…महावितरणकडून वीज भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर…

Ahmednagar news…महावितरणकडून वीज भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर…

0
4090
ahmednagar news load shading

महावितरणने गुरूवारपासून जिल्ह्यात भारनियमनाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त भारनियमन करण्यात येणार आहे.

महावितरणने वेळापत्रक जाहीर करून अधिकृत भारनियमनची घोषणा केली आहे. त्यानुसार शहरी भागात अडीच तासांचे आणि ग्रामीण भागात संबंधित फिडरवरील थकबाकीचे प्रमाण पाहून चार ते पाच तासांचे भारनियमन निश्चित केले आहे. यासाठी ग्रुप पाडले आहेत.

बुर्‍हाणनगर, देवी रोड, अळकुटी, जीपीओ हा भाग ग्रुप सी १ मध्ये असून, येथे सकाळी १ ते १२.३० आणि दुपारी चार ते पाच भारनियमन असेल. ग्रुप सी २ मध्ये सकाळी दहा ते अकरा आणि दुपारी अडीच ते चार या वेळेत असून, यामध्ये कादंबरीनगर, निर्मलनगर, सिव्हील, मार्केट यार्ड परिसर आहे. ग्रुप डी १ मध्ये बोल्हेगाव, सारसनगर, मल्हार चौक, जातेगाव, निघोष यांचा समावेश असून, येथे सकाळी अकरा ते एक आणि दुपारी पाच ते सहा,

ग्रुप डी २ मध्ये सिद्धीविनायक, गुलमोहर, गंजबाजार, स्टेशन रोड,
माळीवाडा असून, येथे सकाळी साडेदहा ते बारा आणि दुपारी साडेतीन ते पाच, ग्रुप ई १ मध्ये पहाटे पाच ते सात आणि सकाळी साडेदहा ते बारा या वेळेत सावेडी गाव, प्रोफेसर चौक, भिंगार, भूषणनगर, नागरदेवळे, आलमगीर येथे भारनियमन असेल.

ग्रुप ई २ मध्ये शिवाजीनगर, बालिकाश्रम रस्ता, अशोका, दरेवाडी, केडगाव, वडनेर, सोनेवाडी या परिसराचा समावेश असून, येथे पहाटे चार ते सहा आणि दुपारी बारा ते दीड या वेळेत भारनियमन होईल.

एफ १ या ग्रुपमध्ये कान्हूर, पिंपळगाव, पोखर्डी या भागात मध्यरात्री अडीच ते साडेचार आणि दुपारी दीड ते साडेतीन,

एफ २ ग्रुपमध्ये लालटाकी, खारेकर्जूने, आठवड येथे पहाटे अडीच ते साडेचार आणि दुपारी दीड ते साडेतीन, जीए ग्रुपमध्ये राळेगणसिद्धी, कुरुंद, शहापूर, अकोळनेर, घोसपुरी येथे पहाटे अडीच ते साडेचार आणि सायंकाळी पावणे सात ते नऊ आणि जीबी ग्रुपमध्ये फकीरवाडा, नवनागापूर, भाळवणी, शेंडी, अरणगाव रस्ता या भागात पहाटे साडेचार ते साडेसहा आणि रात्री पावणे दहा ते बारा या वेळेत भारनियमन होणार आहे.