नगर दक्षिण लोकसभा उमेदवारीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मोठं भाष्य केले. शरद पवार यांच्या गटाकडून आमदार नीलेश लंके यांचे नाव नेहमी चर्चेत येते. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. उमेदवार निश्चितीचे कुठपर्यंत आले आहे? यावर जयंत पाटील म्हणाले, “उमेदवार निश्चितीबाबत बरीच चर्चा झाली आहे. लवकरच आमचा कोण उमेदवार आहे, हे सांगू. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. ती महाविकास आघाडीच्या बैठकीत देखील सांगितले आहे. आता फायनल होईल”.






