Congress..राहुल गांधी मैत्रीणीसोबत नाईट क्लबमध्ये…व्हायरल व्हिडिओनंतर भाजपने साधला निशाणा!

0
2294
Congress Rahul Gandhi

Congress Rahul Gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांचा व्हिडीओ ट्वीट केला असून म्हटलं आहे की, “मुंबईला वेठीस धरलं जात असताना राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते. जेव्हा त्यांच्या पक्षात अनेक स्फोट होत आहेत तेव्हा ते नाईट क्लबमध्ये आहेत. ते सुसंगत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने बाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद सोपवण्यास नकार दिला असतानाच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला फटका बसत आहे”. नेपाळची राजधानी असणाऱ्या काठमांडूमध्ये हा नाईट क्लब आहे. हा तेथील प्रसिद्ध क्लब आहे. राहुल गांधी आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी सोमवारी नेपाळमध्ये पोहोचले होते.

भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे की, हा त्यांचा खासगी दौरा आहे याबाबत काही म्हणणं नाही. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसा झालेली असताना, कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असताना काँग्रेसच्या एका जबाबदार व्यक्तीला पार्टी करणं शोभतं का?

Electric Car….Tata Nexon EV…सिंगल चार्जिंमध्ये 400 कि.मी.ची रेंज