चुकून दुसऱ्याला मेसेज पाठवणे सर्रास घडते. सहसा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, आजकाल असं केल्याने त्रासदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही मुलांसोबत अशीच एक घटना घडली. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला मुलांच्या ग्रुपमध्ये हिंसक मारामारी होताना दिसत आहे. मुलांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. भर रस्त्यात राडा झाला. व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, चुकून मेसेज केल्याने ही मारामारी सुरू झाली आहे. एका मुलीला मेसेज केल्याने मुलं आपापसात भिडल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. https://x.com/gharkekalesh/status/1756548310423449840?s=20