Video: तरुणाचा भन्नाट देसी जुगाड! बाईकला बनविली ७ सीटर…

0
9

कशापासून कधी काय बनवतील याचा नेम नाही. जुगाडू लोकांचे अनेक जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. आपण विचारही करू शकत नाही असा जुगाड लोक करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एका तरुणानं बाईकचा असा जुगाड केलाय. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही थक्क होऊन जाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीने दोन पावले पुढे जाऊन बाईकमध्ये बदल करून ती सात सीटर बनवली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एकाच बाईकवर सात जण बसलेले दिसत आहेत. त्या व्यक्तीने एक लोखंडी सीट बनवली आहे आणि ती बाईकच्या मागच्या बाजूला बसवली आहे आणि स्वतः व्यतिरिक्त सहा लोक बाईकवर बसलेले आहेत. जुगाडी बाईकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.