Video: महिला शिक्षिकेचा वर्गात ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स

0
10

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला शिक्षिका वर्गात ‘कजरा रे’ या बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी एक विद्यार्थिनीही शिक्षकेसोबत डान्स करताना दिसत आहे. जर तुम्ही व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला तर तुम्हाला दिसेल की, ‘हॅप्पी बर्थ डे रश्मी मॅम’ मागे बोर्डवर लिहिलेले आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या शिक्षिकेचा वाढदिवस असण्याची शक्यता आहे आणि मुलांनी शुभेच्छा दिल्यानंतर तिने वर्गात डान्स केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @yeazlas नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे