होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्याआधीच सोशल मीडियावर रंगपंचमीचे व्हिडिओ अन् असंख्य रिल्स पाहायला मिळत आहेत. अनेक रिलस्टार होळीच्या सणाचा उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळे हटके कंटेट तयार करत आहेत. मात्र अनेकदा हे भलते धाडस धोकादायकही ठरु शकते. असाच धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक तरुणी साडी घालून पोल फ्रेमवर लटकून होळी स्पेशल रिल शूट करत आहे. त्यासाठी तिने कलर पॉप अपही चिकटवल्याचे दिसत आहे. मात्र या कलर पॉपमुळेच तरुणीच्या साडीने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडतो. कशीबशी ही तरुणी ती आग विझवते. त्यामुळे रिल्स शूट करताना केलेला हा प्रकार तिच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे.