बचाव पथकाची बिबट्याशी झुंज 🐆… IPS अधिकार्याने शेअर केला थरारक व्हिडिओ

0
2633

आयपीएस अधिकारी शशांक कुमार सावन यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे की, ‘पोलीस आणि वन विभागाच्या पथकासाठी हा खूप कठीण दिवस होता. यावेळी दोन कर्मचारी जखमीही झाले आहेत. बचाव पथकाच्या धैर्याला सलाम. बिबट्यासह सर्वजण आता सुरक्षित आहेत.

सध्या वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुखरूप पकडून त्याची सुटका केल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनवरून लक्षात येत आहे. यावेळी कोणाचंही फारसं नुकसान झालेलं नाही. दरम्यान बचाव कार्यावेळीचा या थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओला एक लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे. नेटकरी कमेंट करत बिबट्याला वाचवणाऱ्या वनविभाग आणि पोलीस पथकाच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.