Thursday, May 16, 2024

Gold- Price : लग्नसराईत ग्राहकांना मोठा झटका, सोन्याचा भाव 75 हजारपार

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्न म्हटलं की सोन्याचे दागिने आलेच. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. मागणी वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. सोन्याचे भाव ७५ हजारांच्या वर पोहचले आहे. सोन्याचे भाव वाढल्यामुळे लग्नसराईच्या काळामध्ये ग्राहक नाराज झाले आहेत.
सराफ बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली असून आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे भाव हे ७५ हजार ३७० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी ८६ हजार ५०० रुपये झाली आहे. येत्या काळामध्ये सोन्या-चांदीचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. ऐन लग्न सराईची धुमधाम सुरू असल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे कोलमडले आहे.

सोन्याच्या भावामध्ये वाढ झाल्यामुळे सराफ बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा सोनं खरेदी करण्याकडे कल कमी दिसून येत आहे. सोन्यामधील गुंतवणूक अधिक प्रमाणात वाढली असून जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सोन्याचे भाव वाढत आहे. सराफा बाजारामध्ये आज ग्राहकांची लगबग कमी दिसून आली. सोनं कधी घ्यावे हा विचार ग्राहक करत आहे. आतापर्यंतची ही सोन्याच्या भावातील सर्वात मोठी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles