Wednesday, May 22, 2024

कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड.. नळाला येईल गार पाणी… व्हिडिओ

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने दाखवल्यानुसार, थर्माकॉल शीट्स घेऊन टाकीभोवती लावल्या आहेत. आणि त्या चिकटपट्टीने टाकीला चिकटविल्या आहेत. यासाठी जाड थर्माकॉल शीट्स घ्या. पातळ घेतले तर ते तूटून जातील, असे महिलेने सांगितले आहे. आता यानंतर गोणपाट घेऊन महिलेने थर्माकॉल शीट्सवर संपूर्ण झाकून घेतलं. गोणपाट उडू नये म्हणून महिलेने दोरीने किंवा खराब वायरने बांधून घेतलं आहे. टाकीच्या वरच्या भागालाही थर्माकॉल शीट्सवर गोणपाट लावून बांधून घेतलं आहे आणि यावर एखादं वजन ठेवण्याचा सल्ला महिलेने दिला आहे. त्यामुळे ते हवेने उडणार नाही आणि त्यानंतर महिलेने या टाकीवर पाणी शिंपडलं आहे. असं केल्याने टाकीतील पाणी गरम होणार नाही, असं दावा महिलेने केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles