Airtel, Jio आणि Vodafone Idea चे प्लॅन्स महाग झाल्यानंतर काही सर्कलमध्ये BSNL सिमची विक्री तीन पटीने वाढली आहे. याशिवाय लाखो युजर्सनी त्यांचे सिम बीएसएनएलकडे पोर्ट केले आहे. अनेक युजर्स आता दरवाढीला कंटाळून या सरकारी कंपनीची निवड करत आहेत.अहवालानुसार, बिहार-झारखंड सर्कलच्या धनबादमध्ये दररोज 500 बीएसएनएल सिम विकले जात आहेत.राजस्थानमध्ये अवघ्या एका महिन्यात 1,61,083 लोक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. याच कालावधीत, 68,412 ग्राहकांनी Airtel आणि 6,01,508 ग्राहकांनी Jio ला निरोप दिला. BSNL ची 4G सेवा पुढील महिन्यात देशाच्या सर्व भागात सुरू होत आहे. सुरुवातीला ग्राहकांना मोफत 4G सिम कार्ड मिळतील. याशिवाय विद्यमान ग्राहकांचे सिमकार्ड सुद्धा मोफत 4G वर अपग्रेड केले जातील.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Airtel, Jio आणि Viच्या प्लॅन्सच्या दरवाढीनंतर ग्राहकांचा BSNL कडे ओढा वाढला….