विकासकामांत आडवे येणार्यांना जनता आडवी करेल : हर्षदा काकडे

0
295

विकास कामात आडवे येणाऱ्यांना जनतेने आडवे केले पाहिजे : सौ.हर्षदा काकडे.
जनशक्ती संवाद यात्रेनिमित्ताने मुर्शदपूर ते सालवडगाव रस्त्याचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन
शेवगाव प्रतिनिधी दि.(०४) गटामध्ये खूप काम करण्याची इच्छा होती परंतु अध्यक्षांकडून कामे देण्यात नेहमीच दुजाभाव करण्यात आला. मी मागितलेल्या कामावर अध्यक्षांकडून काट मारण्याचे काम झाले. जी कामे मी मंजूर करून आणली त्याचीही उद्घाटने करण्याचे काम विरोधकांनी केले. त्यामुळे विकास कामात आडवे येणाऱ्यांना जनतेने आडवे करून त्यांना त्यांची जागा दाखून द्यायची आहे असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी मुर्शदपूर येथे केले.
जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या विकास निधीतून मंजूर मौजे मुर्शदपूर ते सालवडगाव रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आबासाहेब धावणे हे होते तर जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे, उद्योग आघाडीचे प्रमुख अशोकराव ढाकणे, भाऊसाहेब सातपुते, अकबर भाई शेख, आबासाहेब धावणे, भगवानराव डावरे, वि.का.से.सो.चेअरमन जगन्नाथ बोडखे, ह.भ.प.लक्ष्मण ब्राम्हणे महाराज, कारभारी ढाकणे, आदिनाथ धावणे, नवनाथ धावणे, मुरलीधर धावणे,रंगनाथ ढाकणे, बाबासाहेब ढाकणे, किसन ढाकणे, सोपान धावणे, शिवाजी धावणे, सुधाकर ढाकणे, तबाजी बोडखे, तुकाराम बोडखे, वसंतराव लबडे, शिवाजीराव औटी, ज्ञानदेव कातकडे, गहिनीनाथ शिंदे, मंदा धावणे, सुनिता ढाकणे, महादेव जवरे, रेवण जवरे, राजू लोणकर आदि यावेळी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.काकडे म्हणाल्या की, लाडजळगाव गटातील नागरिकांनी जात-पात, नाते-गोते बाजूला सोडून मला मदत केली. त्यामुळेच हे काम करता आले. जि.प.सदस्य हे खूप लहान पद आहे. लाडजळगाव गटात माझ्या अगोदर खूप मोठा बॅकलॉग होता तो भरून काढला आहे. त्यानुसार प्रत्येक गावामध्ये काही न काही देण्याचा मी प्रयत्न केलाअसेही त्या बोलताना म्हणाल्या.
यावेळी बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, निवडणुका येतात जातात परंतु कामाच्या रुपात माणूस नेहमी स्मरणात राहतात. आम्ही जनतेच्या नेहमी ऋणात राहून काम करतो. जनशक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने गावागावात फिरून सर्वसामान्यांचे प्रश्न अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत असेही ते बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वावरे यांनी केले तर आभार सोपान धावणे यांनी मानले.