Ahmednagar Crime पोलिसांसमोर ‘Pushpa’ झुकला… बटाट्याच्या गोण्याखाली लपवलेले साडेतीन कोटींचे रक्तचंदन हस्तगत

0
1043

Ahmednagar Crime Pushpa

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. मै झुकेगा नहीं म्हणत तो चंदन तस्करी करतो असं कथानक आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनात अशा पुष्पांना पोलिसांसमोर कायद्यासमोर झुकावेच लागते.

नगरमध्ये एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री मोठी कारवाई करून सहा ते सात टन रक्तचंदन जप्त केले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे तीन कोटी 25 लाख रूपये किंमत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.
एमआयडीसी हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवलेले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक आठरे यांना मिळाली होती.
त्यांनी पथकासह नमुद ठिकाणी दोन पंचासह छापा टाकुन खात्री केली असता, गोडाऊनमध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले सहा ते सात टन रक्तचंदन मिळून आले आहे.
त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे तीन कोटी 25 लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहे.