आर अश्विन याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

0
52

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.अश्विनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 537 विकेट्स आहेत. आपल्या कारकिर्दीत 37 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. त्याने भारतासाठी 116 एकदिवसीय सामने खेळले असून 156 बळी घेतले आहेत. यासोबत 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 72 बळी घेतले आहेत. मात्र, काही काळ अश्विन फक्त कसोटी खेळत होता.