Video: सामन्यादरम्यान प्रपोज, आधी लाजली नंतर कानाखाली वाजवली…

0
9

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. हा महिना प्रेमीयुगुलांसाठी अधिक खास आणि महत्वाचा मानला जातो कारण या महिन्याच्या १४ तारखेला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. सध्याची तरुणाई प्रेम व्यक्त करण्यासाठी खास नियोजन करुन आपल्या आवडत्या जोडीदाराला प्रपोज करत असतात.अशातच सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एका प्रियकारने केलेल्या प्रपोजवर प्रेयसीचा संताप अनावर झाला आहे त्यात कोणी चालू क्रिकेट सामन्याच्या दरम्यान कोणी आपल्या जोडीदाराला प्रपोज करतो तर कोणी भरबाजारात सर्वांसमोर प्रपोज करत. मात्र या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे.