शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. ४ जुलै रोजी विद्यार्थिनीची आई उमा दीपक भोसले, वय ३५ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक सुनील दिगंबर हांडे, वय ४५ राहणार निवारा कोपरगाव शहर यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २४६/२०२४ भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात सर्वत्र खळबळ उडाली आहे. फिर्यादीत म्हटलं आहे, की कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील चारी नंबर ४५ जवळ असलेल्या शाळेमध्ये आमची मुलगी शिकते. विद्यार्थिनी कुमारी तृप्ती दीपक भोसले वय ९ वर्षे राहणार पढेगाव ही दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी शाळेमध्ये उशिरा गेल्याने शिक्षक सुनील दिगंबर हांडे यांनी तृप्ती हिला वर्गाबाहेर उभे केलं आणि तिच्या छातीत धक्का दिला. ती पायऱ्यांवरून खाली घसरून पडली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तसंच तिला पुढील उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थिनी तृप्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलीचा मृत्यू झाल्या असल्याचा तक्रारी अर्ज मुलीच्या आईने न्यायालयात दाखल केला होता. त्यावरून माननीय न्यायालयाने सदर अर्जावर शिक्षकाविरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सी. आर. पी. सी. १५६ प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले आहेत.
Home क्राईम न्यूज Ahmednagar शाळेत उशिरा आल्याने मुलीला शिक्षा, मुलीचा मृत्यु, जि.प.शिक्षकावर गुन्हा दाखल