Video: चपात्या बनवण्याची नवीन टेक्निक…महिलेने १६ सेकंदात बनवल्या पाच चपात्या

0
21

प्रत्येक महिलेचा बरासचा वेळ स्वयंपाक घरात जातो तसेच स्वयंपाक करणे अनेकांना कटाळंवाणे काम वाटते. स्वयंपाक घरातील काम सोपे करण्यासाठी अनेक स्त्रीया विविध ट्रीक वापरत असतात,ज्यामुळे जेवण बनवणे अगदी सोपे होते. अशात सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात चक्क तिने एका वेळेत जास्त चपाती बनवण्याचा देशी जुगाड केला आहे.
स्वयंपाक घरातील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका गुलाबी रंगाच्या साडीत एक महिला स्वयंपाक घरात दिसत आहे. महिलेचे समोरील किचन ओट्यावर पीठाचे पाच गोळे आहेत. सुरुवातीस महिलेने एका पीठाच्या गोळ्यावर इतर उरलेले पीठाचे गोळे ठेवले. त्यानंतर एक साथ तिने ते लाटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाचवेळी लाटल्यानंतर साधारण पाच चपात्या एकाचवेळी झाल्या. महिलेने केलेला हा जुगाड नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.