अहमदनगर – लग्नाचे आम्हीच दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी गुरुवारी आरोपीला पोलिसांनी अटक केली आरोपी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. आरोपीने पीडितेला लग्न करू,असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. त्यास संगीता रवींद्र बर्डे व रवींद्र पोपट बर्डे (दोघे रा.आगरकरमळा, नगर) यांनी मदत केली. यासंदर्भात पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा नोंद
झाला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी केला. त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले.
आरोपीला न्यायालयाने 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस ठेवण्याचे आदेश दिले आहेत.






