नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत जिल्ह्यातील शेतकरी कर्जदार सभासदांना विकास सेवा सोसायटीमार्फत मोठ्या प्रमाणावर अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शेतकर्यांच्या विकासाच्यादृष्टीने जिल्हा बँक नेहमीच शेतकरीभिमुख निर्णय घेत असून याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील शेतकर्यांना 2023-24 सालासाठी संकरीत गायी/म्हैस पशुपालन खेळते भांडवल कर्ज प्रति एक युनिटसाठी 15 हजारांवरून 20 हजार रुपये करण्यात आले आहे. हे कर्ज सभासदास 7 टक्के या सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होणार असल्याची माहीती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
सभासद याप्रमाणे 2 दुभती जनावरे वरून 4 दुभती जनावरे खरेदी करणेसाठी कर्ज मर्यादा वाढण्यात आली आहे. त्यासाठी या कर्ज मर्यादा प्रती जनावर 60 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये ऐवढी भरघोस वाढ करण्याचा निर्णय बँकेचे संचालक मंडळाने घेतले असल्याचीही माहीती बँकेचे चेअरमन कर्डिले व व्हाईस चेअरमन अॅड. माधवराव कानवडे यांनी दिली. दुग्धव्यवसायाद्वारे जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोठी प्रगती केलेली आहे.