राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत लिपिक वर्गीय कर्मचारी महासंघ तर्फे महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्य शासकीय व जिल्हा परिषद, निमशासकीय लिपिकवर्गीय कर्मचारी यांचे नागपूर येथे अधिवेशन ठिकाणी (यशवंत स्टेडियम नागपूर) दिनांक 19/12/2024 रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यातून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातून मोठ्या संख्येने लिपिक कर्मचारी यांनी उपस्थित राहून आंदोलन करत आपली चौथा वेतन आयोग पासून प्रलंबित वेतन त्रुटी प्रश्न मुख्यमंत्री श्री.देवेद्राजी फडणवीस यांची व मुख्यसाचिव महाराष्ट्र शासन यांच्या समोर प्रभावी पने माडला आणि हे भव्य दिव्य आंदोलन यशस्वी केले आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम शासकीय कार्यालयात निदर्शने करून आपले निवेदन शासनापर्यंत गंभीर नोंद घेण्यासाठी यशस्वीरीत्या प्रस्तावित केले आहे.
– श्री.संतोष जेजुरकर अध्यक्ष,श्री.किसन मेमाणे कार्याधक्ष,श्री.विशाल परदेशी,महासचिव राज्य सचिव रविंद्र मांडे इतर लिपिक सेवक आणि इतर बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.






