मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा… सभापती प्रा.राम शिंदेंच्या वक्तव्याची चर्चा

0
27

आपण आता विधानपरिषदेचे सभापती झालो, त्यामुळे पक्षाच्या बैठकीला जाऊ शकत नाही किंवा पक्षाची भूमिका मांडू शकत नाही असं अनेकांना वाटतं. पण तसा काही प्रोटोकॉल नसल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. आपल्याला सर्वकाही जमतं त्यामुळे यापुढे मी सांगेन तो आदेश आणि बोलेन तो कायदा असंच असेल असा इशारा राम शिंदे यांनी दिला. राम शिंदे यांनी हा इशारा नेमका कुणाला दिला याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. विधानपरिषदेचे सभापती झाल्यानंतर राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमाला भाजपचे आमदार मात्र अनुपस्थित होते.

राम शिंदे म्हणाले की, “विधानपरिषदेचे सभापती पद मिळाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुणी म्हणतं राम शिंदे यांचं पद हे हायकोर्टासारख आहे. त्यांना आता पक्षाचं काही बोलता येत नसतं. ते मिटींगला येत नसतात, त्यांना तसं काही जमत नाही. पण तसं काही नाही. सभापतीला सर्व काही जमतं. आता तर मी सांगेन तो आदेश आणि मी बोलेन तो कायदा आहे. आपल्याला सर्वकाही जमतं.”