सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डेटा सेंटरला शैक्षणिक औद्योगिक भेट

0
34

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डेटा सेंटरला शैक्षणिक औद्योगिक भेट

*पुणे, 30/01/2025* – समजाभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेवगाव कॉम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी 30/01/2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डाटा सेंटर येथे औद्योगिक भेट देऊन महत्त्वपूर्ण तांत्रिक ज्ञान मिळवले. या भेटीचे आयोजन विद्यार्थ्यांना आधुनिक डेटा स्टोरेज, क्लाऊड कम्प्युटिंग आणि सायबर सुरक्षा याबाबत व्यावहारिक अनुभव मिळावा यासाठी करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना संतोष थोरात सर (डाटा सेंटर हेड) आणि रमेश चेडे सर यांनी डेटा सेंटरमधील विविध विभाग दाखवले आणि सर्व्हर, नेटवर्किंग यंत्रणा आणि डेटा सुरक्षा याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी डेटा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि डिजिटल सेवा तसेच व्यवसायांना डेटा सेंटरची गरज कशी असते, याची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांना त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली. त्यांनी उत्साहाने तज्ज्ञांशी चर्चा केली व माहिती तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल विचारणा केली.

सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी च्या व्यवस्थापनाने दिलेल्या सहकार्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांनी आभार मानले. यावेळी कॉम्प्युटर विभागाचे शिक्षक बोराले सर, शिरसाट सर, दळे सर, पुरनाळे सर, येवले मॅडम, आणि चेमटे मॅडम हजर होते.भेटीचा समारोप प्रश्नोत्तर सत्राने झाला, जिथे विद्यार्थ्यांना उद्योगातील उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

अशा औद्योगिक भेटी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करतात आणि त्यांना भविष्यातील करिअरसाठी दिशा मिळवून देतात.