नगर शहरात नगरसेवक हरवले…तृतीय पंथीयांकडुन बक्षीस जाहीर!

0
2992

अहमदनगर (प्रतिनिधी) – तारकपूर भागातील प्रभाग क्र.4 मध्ये सिंधी कॉलनी येथे 30 ते 40 तृतीयपंथी कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. या तृतीय पंथीयांना मनपाच्या नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ मनपा आयुक्त शंकर गोरे यांना तृतीयपंथी कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष काजल गुरु यांनी निवेदन दिले यावेळी समवेत रिटा, सना, साधना आदीसह तृतीयपंथी उपस्थित होते.
नागरी समस्यांनी तृतीयपंथीयांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे, परिसराची वेळेवर साफसफाई होत नाही, चेंबर तुंबलेले आहेत, वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही. लाईटची गंभीर समस्या असून सदर परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे अशा अनेक नागरी समस्यांना तृतीय पंथीयांना सामोरे जावे लागत आहे. सदर प्रभागातील नगरसेवकांना संपर्क साधला असता संबंधित लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहे असा आरोप तृतीयपंथी संघटनेच्या वतीने करण्यात आला तसेच या प्रभागातील नगरसेवकांना सापडून दिल्यास २५ पैसे बक्षीस रोख स्वरूपात संबंधित व्यक्तीला दिले जाणार असल्याचे तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु म्हणाले तसेच येत्या सात दिवसात समस्या सोडविल्या नाहीतर मनपा कार्यालयाच्या आवारात टाळ्या वाजवा आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.