नगर तालुका बाजार समितीवर प्रशासक असताना मी बाजार समितीत एकदा गेलो होतो. कारभार पाहून चक्रावून गेलो, मनात आणलं असत तर त्या क्षणी संचालक मंडळ जेलमध्ये गेले असते. पण संचालक मंडळ नावाला आहे. खरा मलिदा दुसरीकडेच जात आहे हे समजले. विनाकारण इतरांना त्रास नको. त्यामुळे शांत राहिलो. कार्यकर्ते मेले तरी चालतील. पण स्वतःची घरे भरली पाहिजेत, ही नगर तालुक्यातील या राजकारण्यांची मानसिकता आहे, असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.






