जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी जिल्ह्यात संपूर्ण काँग्रेस सत्यजित तांबे यांच्या पाठीशी राहील, असे वक्तव्य केले होते. तरी त्यांचे कट्टर समर्थक असलेले साळुंके यांनी उघडपणे तांबे यांना पाठिंबा दर्शविला आहे. याचाच अर्थ थोरात यांची भूमिका तांबे यांच्या बाजुनेच असेल, असे मानले जाते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी साळुंके यांना नोटीस दिली असून, आपल्या वक्तव्याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून ही नोटीस देण्यात येत असल्याचाही उल्लेख त्यात आहे.