नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवित नाही तर काँग्रेस पक्षाची अवस्था तशीच आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी नुकतीच भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भाजपचे भैया गंधे यांची भेट घेतली. भाजपचा सत्यजीत तांबेंना पाठिंबा नसल्याचा खुलासा केला. तसेच वरिष्ठांचा अद्याप कोणताही आदेश आला नसल्याचे सांगितले.