जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची निवड प्रक्रिया येत्या बुधवारी (दि. 8 मार्च) होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची निवड सहकार निवडणूक प्राधिकरणाने केली आहे.
विखे पिता-पुत्र बँकेत लक्ष घालणार?
जिल्हा बँकेच्या राजकारणापासून लांब असणारे मात्र राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता आल्यानंतर नगर जिल्ह्याच्या राजकारणात कमालीचे सक्रिय झालेले पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हा बँकेच्या राजकारणात रस दाखवणार का? चेअरमन पदाच्या स्पर्धेत कोणाला पाठिंबा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.