अहमदनगर- दौंड रस्त्यावर कोळगाव दरम्यान श्रीगोंदा-नगर एसटी बस बंद पडली होती.बराच वेळ धक्का मारून देखील बस सुरू होत नव्हती. त्याचवेळी त्या मार्गावरून जाताना आमदार निलेश लंके यांनी आपली गाडी थांबवली आणि काय झाले आहे, याची विचारपूस केली. इतकचं नाही तर त्यांनी गाडीतून उतरुन बस लोटण्यासही मददत केली
धक्का देऊनही बस सुरू होत नसल्याने थेट आमदार निलेश लंके यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हातात घेतले. त्यांनी बसचे स्टेअरिंग हातात घेताच बस सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांनी देखील आनंद व्यक्त केला. स्वतः आमदार बस चालवत असल्याचे बघून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही सुखद धक्का बसला. लोकप्रतिनिधईंनी जनतेच्या कामांसाठी कसे धावून जायला हवे, याचे उदाहरणच लंके यांनी घालून दिल्याची चर्चा प्रवाशांत होती.