अहमदनगर जिल्ह्यात वायरमनसह दोघे ‘एसीबीच्या’ जाळ्यात

0
1044

पारनेर-तालुक्यातील निघोज येथे शेतकर्‍याच्या घराचा जळालेल्या इलेक्ट्रीक मिटर बदलून देण्यासाठी 2 हजार 800 रुपयांची लाच स्विकारणार्‍या विद्युत वितरण कंपनीच्या वायरमन तसेच ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. किशोर बाळासाहेब कळकुटे (वायरमन) व विकास अशोक वायदंडे (ऑपरेटर) दोघेही निघोज सेक्शन अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

आज निघोज येथील वीज वितरण कार्यालय येथे सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात आले. एलसीबीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार निघोज परिसरातील एका शेतकर्‍याच्या घराचा इलेक्ट्रीक मिटर जळाला होता. तो बदलून नवीन बसवण्यासाठी वायमन कळकुटे याने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तडतोडी अंती 2 हजार 800 रक्कम ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज सापळा रचून कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.