नगर : गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्ह्यात करोनाने मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र आता करोना पुन्हा आला असून हातपायही पसरत आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 76 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. नगर शहरात 21 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाचा धोका अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
– संगमनेर – 1
अकोले – 0
राहुरी – 2
श्रीरामपूर –6
नगर शहर मनपा –21
पारनेर – 4
पाथर्डी – 5
नगर ग्रामीण – 8
नेवासा -0
कर्जत – 3
राहाता – 4
श्रीगोंदा – 2
कोपरगाव – 2
शेवगाव – 5
जामखेड – 1
भिंगार छावणी मंडळ – 8
इतर जिल्हा –1
मिलिटरी हॉस्पिटल – 3
इतर राज्य – 0
जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 12, खासगी प्रयोगशाळेत 38 तर अँटीजेन चाचणीत एकूण 9 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.