Ahmednagar crime अनैतिक संबंधातून खून ,पत्नीनेच काढला नवऱ्याचा काटा!

0
1444

तीन दिवसांपुर्वी खर्डा येथील विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२) या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत खून झाला होता. मात्र जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवघ्या दोन दिवसात तपास करीत या खुनाचा उलगडा केला. आपला नवरा हा अनैतिक संबधाला अडथळा ठरत आसल्याने या गुन्ह्य़ातील मयताची पत्नी व तीचा प्रियकर व त्याच्या मित्राने खुन केला आसल्याने निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी जामखेड पोलिसात मयताचा भाऊ सुशेन ईश्वर सुर्वे यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विशाल ईश्वर सुर्वे (वय २६, रा . सुर्वे वस्ती, खर्डा ता.जामखेड) हा दि १४ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराकडे चालला होता. यावेळी मयत विशाल च्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपासाची चक्रे फीरवत गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध शोध पथके तयार करण्यात आली होती. त्या नुसार तपास करत आसताना मयताची पत्नी व त्यांच्या नात्यातील आरोपी कृष्णा संजय सुर्वै या दोघांचे अनैतिक संबंध होते. मात्र या अनैतिक संबंधाला मयत विशाल सुर्वे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्यामुळे विशाल याचा काटा काढण्यासाठी आरोपीची पत्नी हीने कट रचला होता. मयत विशाल सुर्वे हा त्या दिवशी काम आटोपून घरी येत असताना पत्नी ही मोबाईलच्या माध्यमातून पतीच्या संपर्कात होती. मयत विशाल हा आपली रीक्षा घेऊन येत आसताना तो त्यांच्या खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जात आसताना लक्ष्मीआई मंदिराजवळ गाडी आली या वेळी आरोपी कृष्णा सुर्वे रा सुर्वे वस्ती, खर्डा व त्याचा मित्र श्रीधर राम कन्हेरकर वय २७ रा. खर्डा शिवार याच्या मदतीने विशाल याच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत विशाल याचा जाग्यावरच मुत्यू झाला.
दि १५ रोजी तपासात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस अंमलदार सचिन पिरगळ, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, शेषराव म्हस्के, संभाजी शेंडे, अबासाहेब अवारे, विजय कोळी, संदीप राऊत, अरुण पवार, यांनी खर्डा परीसर पिंजून काढत आत्यंत बारकाईने माहीती काढुन आरोपी कृष्णा संजय सुर्वे वय १९ रोजी अटक केली. तर याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या टीमने तपास करीत दुसरा आरोपी श्रीधर रामा कन्हेकर वय २७ यास अटक केली. तसेच गुन्ह्यात पत्नी चा देखील हात आसल्याने तीला देखील पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व पो.हे.कॉ संजय लाटे हे करत आहेत