फेसबुकवर अश्लिल पोस्ट शेअर करून महिलेची बदनामी,गुन्हा दाखल

0
43

नगर – फेसबुकवर महिलेबाबत अश्लिल पोस्ट शेअर करून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तिच्या मेहुण्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी खंडागळे (रा. गोयेगाव, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या घटनेसंदर्भात पीडितेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, खंडागळे याने तीन वर्षापासून ते दि. 9 मार्च 2023 पर्यंत वेळोवळी बहिणीस राहत्या घरी येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला देखील शिवीगाळ केली. दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी व त्यानंतर वेळोवेळी खंडागळे याने त्याच्या फेसबुकवरून माझा, आई- वडील व भाऊ यांचा फोटो अपलोड करून त्यावर त्याने फिर्यादीबाबत अश्लि ंल पोस्ट शेअर करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.