Home क्राईम न्यूज नगर शहरातील डॉक्टरच्या घरी चोरी, आरोपी अटक कोतवाली पोलीसांची कारवाई..

नगर शहरातील डॉक्टरच्या घरी चोरी, आरोपी अटक कोतवाली पोलीसांची कारवाई..

0
18

डॉक्टर पंडीत यांच्या बंगल्याचे नविन ए.सी. चोरणाऱ्यास अटक, 1,20,000 रू किमतीचा मुददेमाल हस्तगत; कोतवाली पोलीसांची कारवाई..

दि. ०५/०४/२०२३ रोजी शहरातील नामवंत डॉक्टर राहुल नामदेव पंडीत यांचे नविन घराचे साई, नगर भोसले आखाडा, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे बांधकाम चालू असून त्यांनी घरात बसविण्या करीता च्यु स्टार कंपनीचे एकूण ०५ ए.सी. बंगल्यात आणून ठेवले होते. त्या पैकी दोन ए.सी. हे कोणी तरी अज्ञात चोरटयांने ते चोरून नेले. बाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दिनांक २२/०४/२०२३ रोजी गुन्हा क्रमांक ३५८/२०२३ भाविक ३८० प्रमाणे डॉ. पंडीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना दिनांक २४/०४/२०२३ रोजी कोतवाली पोलीसांना बातमी मिळाली की, काटवन खंडोबा कमानीच्या जवळील सीना नदीच्या पुलावर एक इसम त्याचे ताब्यातील मेस्ट्रो मोपेड गाडी न एमएच १६ बी डी २८३० हीचेवर संशयास्पद फिरत असून पोलीसांनी गोपनियरित्या पाळत ठेवली असता, त्याचे हालचाली संशायस्पद वाटत असल्याने त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव प्रवेश भापकर काळे वय २६ वर्षे रा. साईनगर बुरुडगांबरोड अहमदनगर असे सांगीतले. परंतु त्याचा हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्यास पोलीस ठाण्यात घेवून येवून त्याचेकडे अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने दिनांक १०/०४/२०२३ रोजी पहाटे ०३.०० वाजण्याचे सुमारास साईनगर येथील डॉ पंडीत यांचे बांधकामावरुन दोन नविन एसी (एअर कंडिशनर) चोरल्याचे कबुल करुन गुन्हयातील दोन्ही नविन ए.सी. (किंमत रुपये १,२०,०००/-) चे काढूण दिल्याने ते गुन्हयाचे तपास कामी जप्त करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार देवराम ढगे, तनविर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.